मविआला तडा? बैठकीतून पवारांची राष्ट्रवादी गायब!

मविआला तडा? बैठकीतून पवारांची राष्ट्रवादी गायब!

राखी राजपूत | Updated on: Feb 23, 2026 | 10:13 AM

अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी महाविकास आघाडीत फूट पडल्याचे संकेत मिळत आहेत. विरोधकांच्या पत्रकार परिषदेला आणि बैठकीला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची अनुपस्थिती लक्षवेधी ठरली. काँग्रेस नेत्यांनी यापूर्वीच राष्ट्रवादीवर अवलंबून न राहण्याचा सल्ला दिल्याची माहिती आहे, ज्यामुळे आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच महाविकास आघाडीमध्ये संभाव्य फूट पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. विरोधकांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकाही नेत्याने हजेरी लावली नाही. या पत्रकार परिषदेला काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते उपस्थित होते.

या अनुपस्थितीमुळे महाविकास आघाडीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काँग्रेस नेत्यांनी याबाबत “कम्युनिकेशन गॅप” झाल्याचे कारण दिले असले तरी, यापूर्वी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीलाही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही नेता उपस्थित नव्हता. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षांनी सरकारला दिलेल्या बहिष्कार पत्रावरही राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांची स्वाक्षरी नव्हती. या घटनांमुळे आगामी काळात महाविकास आघाडीचे भवितव्य काय असेल, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Published on: Feb 23, 2026 10:13 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us