tv9 Marathi Special Report | विधान परिषदेसाठी मविआत पेच कायम; उद्धव ठाकरे विधान परिषद न लढण्यावर ठाम?
राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असताना महाविकास आघाडीसमोर उमेदवार निवडीचा तिढा कायम आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक असतानाही अद्याप महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधान परिषद निवडणूक न लढण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. मात्र, आघाडीतील नेत्यांकडून त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे समोर येत आहे.
राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असताना महाविकास आघाडीसमोर उमेदवार निवडीचा तिढा कायम आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक असतानाही अद्याप महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधान परिषद निवडणूक न लढण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. मात्र, आघाडीतील नेत्यांकडून त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे समोर येत आहे. ठाकरे उमेदवार असल्यास निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीकडे सध्या एक उमेदवार निवडून येईल इतकेच संख्याबळ असल्याचे चित्र आहे. विधान परिषद निवडणुकीत विजयासाठी 29 मतांचा कोटा आवश्यक आहे. अशा परिस्थितीत ठाकरे निवडणूक लढले नाहीत, तर आघाडीचा उमेदवार कोण असणार याबाबत चर्चा रंगू लागली आहे. काँग्रेसकडून उमेदवार दिला जाण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, शिंदे गटाकडून दहावा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती मिळत आहे, ज्यामुळे निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.
एकूणच, अर्ज भरण्याची मुदत जवळ येत असताना महाविकास आघाडीतील उमेदवाराचा पेच अजूनही सुटलेला नाही. अखेरच्या क्षणी उद्धव ठाकरे निवडणूक लढवण्यास तयार होतील की दुसऱ्या नेत्याला संधी दिली जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on: Apr 28, 2026 11:18 AM
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप

