Nagpur Congress | नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, दिल्ली दरबारी सोनिया गांधीपुढे फैसला होणार

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव आणि माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक (Mukul Wasnik) यांच्या समर्थकाचं निलंबन केल्यानंतर राजकारण पेटलं आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव आणि माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक (Mukul Wasnik) यांच्या समर्थकाचं निलंबन केल्यानंतर राजकारण पेटलं आहे. नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव गज्जू यादव (Gajju Yadav) यांना निलंबित केल्यानंतर जिल्हा काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीला ऊत आला आहे. गज्जू यादव यांनी माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक (Rajendra Mulak) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

नागपूर जिल्ह्यात मुकुल वासनिक समर्थक विरुद्ध राजेंद्र मुळक वाद चव्हाट्यावर आला आहे. राजेंद्र मुळक यांनी षडयंत्र रचल्याचा आरोप वासनिक समर्थक गज्जू यादव यांनी केला आहे. “राजेंद्र मुळक यांचा रामटेक विधानसभेवर डोळा असल्याने खोटे आरोप करत त्यांनी निलंबित केलं” असा आरोप गज्जू यादव यांनी केला. “निलंबनाविरोधात काँग्रेस हायकमांडकडे दाद मागणार” असा इशाराही यादव यांनी दिला आहे. त्यामुळे नागपूर जिल्हा काँग्रेसमधला वाद अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यापर्यंत जाण्याची शक्यता आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI