दाराची कडी तोडली, मध्यरात्री मुलींच्या वसतिगृहात घुसून..; धक्कादायक घटनेने नागपूर हदारलं!
नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील ओबीसी मुलींच्या सरकारी वसतिगृहात घुसून एका विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आल्याची हादरवणारी बातमी आहे. आरोपींनी दाराची कडी तोडून खोलीत प्रवेश केला आणि तरुणीवर अत्याचार केला. या वसतिगृहात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यासह पुरेशी सुरक्षाही नसल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून तपास सुरू आहे.
नागपूरमधील सरकारी मुलींच्या वसतिगृहात दोन आरोपी घुसले आणि एका तरुणीच्या खोलीत प्रवेश करून तिचा विनयभंग केला. यानंतर तिचा मोबाईल घेऊन ते फरार झाले. ही घटना २२ जुलैच्या रात्री तीन वाजता घडली. या वसतिगृहात ६४ मुली राहतात. पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत, परंतु अद्याप त्यांना अटक करण्यात यश आलेले नाही. या घटनेमुळे वसतिगृहातील इतर मुलींमध्ये दहशतीचे वातावरण आहे. यासह नागपूरमधील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलिस आरोपींना कधी पकडणार? वसतिगृहात सीसीटीव्ही कधी बसवले जाणार? आणि ६४ मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न कधी सुटणार? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

