AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूरच्या ऐतिहासिक मारबत उत्सवाला सुरुवात, काळी पिवळी मारबत मिरवणुकीत

नागपूरच्या ऐतिहासिक मारबत उत्सवाला सुरुवात, काळी पिवळी मारबत मिरवणुकीत

| Updated on: Sep 11, 2026 | 12:27 PM
Share

नागपुरातील १४५ वर्षांच्या ऐतिहासिक मारबत उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. काळी आणि पिवळी मारबत मिरवणुकीसाठी सज्ज असून, समाजातील वाईट प्रवृत्तींवर प्रहार करणारे बडगे यंदाचे मुख्य आकर्षण ठरले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह लाखो नागपूरकर हा अनोखा उत्सव पाहण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत.

नागपुरात ऐतिहासिक मारबत उत्सवाला सुरुवात झाली असून, नागपूरकर मोठ्या उत्साहात सहभागी झाले आहेत. गेल्या १४५ वर्षांपासूनची ही परंपरा नागपूरची सांस्कृतिक ओळख बनली आहे. यंदाही काळी आणि पिवळी मारबत मिरवणुकीसाठी निघाली असून, बुधवारी परिसरातून निघालेली पिवळी मारबत लवकरच नेहरू पुतळ्याजवळ काळ्या मारबतीला भेटणार आहे. हा गळाभेट सोहळा उत्सवातील एक महत्त्वाचा क्षण मानला जातो. समाजातील वाईट प्रवृत्ती आणि अनिष्ट विचार यांच्यावर प्रहार करणारे बडगे हे या उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले आहेत.

हे बडगे अनेक सामाजिक संदेश देतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह देश-विदेशातील अनेक पाहुणे हा अनोखा उत्सव पाहण्यासाठी नागपुरात दाखल झाले आहेत. लाखो नागपूरकर “इडापीडा घेऊन जा गे मारबत” असा जयघोष करत रस्त्यावर उतरले आहेत. १८८५ मध्ये पिवळ्या मारबतीची सुरुवात झाली होती. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच तान्हा पोळ्याच्या दिवशी, हा उत्सव नागपुरात मोठ्या उत्साहात साजरा होतो.

Published on: Sep 11, 2026 12:23 PM

Follow Us