कौटुंबिक छळाचा आणखी एक बळी! सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय महिलेने उचलले टोकाचे पाऊल
नागपुरातील हुडकेश्वर परिसरात कौटुंबिक वाद आणि छळाला कंटाळून 26 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी पती आणि सासूविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला
नागपुरातील हुडकेश्वर परिसरात कौटुंबिक वाद आणि छळाला कंटाळून 26 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी पती आणि सासूविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून पती नितीन डांगसे याला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,मृत अंकिता हिने 2022 मध्ये नितीन डांगसे याच्याशी प्रेमविवाह केला होता. या दाम्पत्याला अडीच वर्षांचा मुलगाही आहे. मात्र लग्नानंतर नितीन हा वारंवार अंकिताशी वाद घालत होता. तसेच तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करत असल्याचा आरोप अंकिताच्या नातेवाईकांनी केला आहे.
4 जून रोजी अंकिताने राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही घटना लक्षात येताच कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने पुढे शासकीय वैद्यकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
Published on: Jun 07, 2026 12:52 PM
लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला ठाकरेंचा थेट इशारा
दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! आदित्य -अमित एकाच मंचावर
पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत....

