Who is Fahim Khan : नागपुरातील हिंसाचाराचा मास्टरमाईंड समोर, कोण आहे फहीम खान?
नागपुरात दोन दिवसांपूर्वी मोठा हिंसाचार उफाळला. नागपुरात दोन गटांमध्ये झालेल्या राड्यानंतर जाळपोळ, तोडफोड करण्यात आली. आता नागपुरातील या संपूर्ण हिंसाचारामागे नेमकं कोण? असा सवाल केला जात असताना फहीम खान याचं नाव समोर आलं आहे.
फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) शहराध्यक्ष आहे. फहीम खान याचं शिक्षण इयत्ता दहावीपर्यंत झालंय. सध्या त्याचं वय हे ३८ वर्ष इतकं आहे. मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) शहराध्यक्ष असलेल्या फहीम खान याने लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्याला १ हजार ७३ मतं मिळाली होती. फहीम खानने नागपुरात जमाव जमवल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराचा मास्टरमाईंडचे नाव पहिल्यांदा समोर आले असून नागपुरात झालेल्या हिंसाचारामागे फहीम खान असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. फहीम खान याने लोकांना भडकवण्याचे काम केले. त्यानंतर ही हिंसा घडली. नागपूरमधील गणेशपेठ पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या दुसऱ्या तक्रारीमध्ये उघड झाले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. तर नागपुरात दोन दिवस सुरू असलेल्या हिंसाचारात औरंगजेबाच्या कबरी विरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. तसेच औरंगजेबाचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. याचा निषेध करण्यासाठी, मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) शहराध्यक्ष फहीम खान याच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?

