Nagpur | नागपुरात एकाच दिवशी 42 हजार नागरिकांचे लसीकरण, महापौर दयाशंकर तिवारी यांची माहिती

कोरोनापासून बचावासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. नागपुरात एकाच दिवस तब्बल 42 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. (Nagpur Record 42,000 people have been Corona vaccinated)

राज्यात कोरोना लसीकरण मोहिमेने चांगलाच वेग धरला आहे. कोरोनापासून बचावासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. नागपुरात एकाच दिवस तब्बल 42 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यामुळेच नागपुरात लसीकरणाचा विक्रम पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपूर जिल्ह्यात लसीकरणाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. नागपुरात कालपासून 18 वर्षांवरील तरुणांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. यानंतर एकाच दिवशी जिल्ह्यात तब्बल 41 हजार 881 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत हा सर्वाधिक आकडा आहे. विशेष म्हणजे फक्त शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातील नागरिक लसीकरणासाठी मोठ्या संख्येने पुढे येत आहेत. नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काल 18 हजार 18 नागरिकांनी लस घेतली. तर महानगरपालिका क्षेत्रामध्ये 22 हजार 221 नागरिकांनी लस घेतली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI