Nana Patole | राणेंची तब्येत बरी नसेल तर राज्य सरकार त्यांच्यावर उपचार करेल : नाना पटोले

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची तब्बेत ठीक नसेल तर सरकार उपचार करेल, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राणेंवर टिका केली. राज्यात खऱ्या अर्थाने नव्या नव्या घटना भाजपा तर्फे घडत आहेत. त्या कधी घडल्या नाहीत. राणेंच्या वक्तव्याचा काँग्रेसच्या वतीने निषेध केला.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Nupur Chilkulwar

Aug 25, 2021 | 9:15 AM

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची तब्बेत ठीक नसेल तर सरकार उपचार करेल, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राणेंवर टिका केली. राज्यात खऱ्या अर्थाने नव्या नव्या घटना भाजपा तर्फे घडत आहेत. त्या कधी घडल्या नाहीत. राणेंच्या वक्तव्याचा काँग्रेसच्या वतीने निषेध केला. एक केद्रींय राज्यमंत्री पंतप्रधानांना बैल म्हणतात. मुख्यमंत्र्यांच्या बाबत असं विधान करणं चुकीचंय. यांची जीभ कशी घसरते. कायद्या पेक्षा कोणी मोठा नसतो. कायदेशीर कारवाई होणार, असंही ते म्हणाले. हल्ली सोशल मीडियावर सुद्धा कोणी बोललं तर करवाई ही होतेच. राणेंच्या वक्तवव्याचा जर कुणी समर्थन करत असेल तर त्यांना लखलाभ, असंही ते म्हणाले.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें