Nana Patole | हिवाळी अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड होणार – नाना पटोले

अध्यक्ष निवड प्रक्रियेसाठी तीन दिवसांचा कालावधी लागतो त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवड आतापर्यंत झाली नाही. हिवाळी अधिवेशनात मात्र विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड होईल व ती आवाजी मतदानाने होईल.

मुंबई : विधानसभेच्या अध्यक्षपदाची (Legislative Assembly Speaker) निवड डिसेंबर महिन्यात होत असलेल्या हिवाळी अधिवेशनातच (Winter Session) होईल व अध्यक्ष काँग्रेस पक्षाचाच होईल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी स्पष्ट केले आहे. टिळक भवन येथे प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना पटोले यांनी ही माहिती दिली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत झालेल्या अधिवेशनाचा कालावधी कमी होता. अध्यक्ष निवड प्रक्रियेसाठी तीन दिवसांचा कालावधी लागतो त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवड आतापर्यंत झाली नाही. हिवाळी अधिवेशनात मात्र विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड होईल व ती आवाजी मतदानाने होईल. आवाजी मतदानाने निवड होण्याची पद्धत देशभर सर्वच राज्यात आहे त्यात काही गैर नाही. विधानसभेने त्यांच्या नियमावलीत बदल केलेला आहे. महाराष्ट्रातही विधान परिषदेच्या सभापतीपदाची निवड याच पद्धतीने होत असते त्यामुळे यावर आक्षेप घेण्याचे काही कारण नाही, असं पटोले म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI