घराचं छप्पर उडालं, भांडे सामान अस्ताव्यस्त अन्… वादळासह अवकाळीनं गरिबांवर संकटाची छाया
VIDEO | नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं घरांचे प्रचंड नुकसान, बळीराजा झाला हवालदिल
नांदेड : गेल्या काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात मुखेड तालुक्यालाही गारपिटीने झोडपले, वर्ताळा, सावरगाव गावाच्या शिवारात मोठी गारपीट झाली आणि वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस झाला होता. आता नांदेड जिल्ह्यातील नायगांव कंधारसह काही भागात आज सकाळीपासून अवकाळी पाऊस सुरूच आहे, कुठे मध्यम तर कुठे हलक्या स्वरूपात हा पाऊस बरसतोय. काल जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या गारपीटीसह पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता, त्यातच आताही पाऊस सुरूच असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडलीय. विशेषतः हळद उत्पादक शेतकऱ्यांचे यामध्ये मोठे नुकसान होतंय. नांदेड जिल्ह्यात सर्वत्र वादळी वाऱ्यासह मोठ्याप्रमाणात गारपीट झाल्याने यामध्ये शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांचे आणि भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे पाहायला मिळत आहे. दोन दिवस जिल्ह्यात झालेल्या वादळासह अवकाळी पावसाने गोर-गरिबांच्या घराचे छप्परं उडाली तर घरातील सामान भांडे देखील वादळी वाऱ्यासह अस्ताव्यस्त झाल्याचे पाहायला मिळाले,
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

