Narhari Zirwal | व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित? चर्चांना उधाण
व्हायरल क्लिपमुळे वादात सापडलेले अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी प्री-कॅबिनेट बैठकीला अनुपस्थिती दर्शवली आहे. याशिवाय बाबासाहेब पाटील आणि इंद्रनील नाईल यांनीही बैठकीला पाठ फिरवल्याने राजकीय चर्चांना जोर मिळाला आहे.
व्हायरल क्लिपमुळे वादात सापडलेले अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी प्री-कॅबिनेट बैठकीला अनुपस्थिती दर्शवली आहे. याशिवाय बाबासाहेब पाटील आणि इंद्रनील नाईल यांनीही बैठकीला पाठ फिरवल्याने राजकीय चर्चांना जोर मिळाला आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या प्री-कॅबिनेट बैठकीत छगन भुजबळ, अदिती तटकरे, दत्तामामा भरणे आणि हसन मुश्रीफ उपस्थित होते. या घडामोडींमुळे झिरवळ यांचा राजीनामा घ्यावा लागेल की पक्ष त्यांना अभय देईल, यावर जोरदार चर्चा रंगली आहे. आज दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली, परंतु झिरवळ या बैठकीलाही अनुपस्थित होते. प्री-कॅबिनेट बैठकीत प्रामुख्याने झिरवळ यांच्या संदर्भातील व्हायरल व्हिडिओ प्रकरणावर चर्चा झाली आणि पक्षाची पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष आहे. विरोधकांकडून झिरवळ यांचा राजीनामा मागितला जाणार आहे, त्यामुळे त्यांचे मंत्रिपद धोक्यात असल्याची चर्चाही सुरू आहे. मंत्रिमंडळ आणि पक्षाच्या कॅबिनेट बैठकीला झिरवळ अनुपस्थित राहिल्यामुळे आगामी राजकीय परिस्थितीबाबत चर्चांना उधाण आले आहे.
Published on: Apr 01, 2026 01:41 PM
राज्यात पावसाचा हाहाकार! विज पुरवठाही खंडीत, तब्बल 4 शहरांना...
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...

