Jana Ashirwad yatra | केंद्रीय मंत्री नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा सिंधुदुर्गात दाखल, कार्यकर्ते-समर्थकांची तुफान गर्दी

केंद्रीय मंत्री नारायण राणे सिंधुदुर्गात पोहोचले आहेत. राणे यांचा ताफा सिंधुदुर्गात पोहोचताच ढोल-ताशांच्या गजरात त्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी स्थानिक नागरीक आणि कार्यकर्त्यांनी देखील प्रचंड गर्दी केली होती.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: चेतन पाटील

Aug 28, 2021 | 8:51 PM

केंद्रीय मंत्री नारायण राणे सिंधुदुर्गात पोहोचले आहेत. राणे यांचा ताफा सिंधुदुर्गात पोहोचताच ढोल-ताशांच्या गजरात त्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी स्थानिक नागरीक आणि कार्यकर्त्यांनी देखील प्रचंड गर्दी केली होती. जागोजागी नारायण राणे यांचा सत्कार केला जातोय. त्यांचं अभिनंदन केलं जातंय. नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रिमंदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर महाराष्ट्रात जनआशीर्वाद यात्रा सुरु केली आहे. या यात्रेला वादाची एक किनारदेखील आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं या यात्रेकडे लक्ष आहे. तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार प्रसाद लाड हे देखील नारायण राणे यांच्यासोबत जनआशीर्वाद यात्रेत सहभागी झाले आहेत.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें