राणेंविरुद्ध बोललं की शिवसेनेत पद मिळतं, नारायण राणे यांची खोचक टीका

चिपळूणला तर काही मोठ्या फुशारक्या मारत होते, आम्ही हे करु ते करु, अशा फुशारक्या मारल्याशिवाय पदं मिळत नाहीत. माझ्यावर बोलल्याशिवाय शिवसेनेत पदं मिळत नाहीत, असं नारायण राणे म्हणाले. अजित पवारला अजून अज्ञान आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Yuvraj Jadhav

Aug 29, 2021 | 1:26 PM

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या जनआशीर्वाद यात्रेची सांगता केली. काय आदेश ओ, रथआशीर्वाद यात्रा मी जाऊ देणार नाही, सैनिकांनी ती अडवावी. चिपळूणला तर काही मोठ्या फुशारक्या मारत होते, आम्ही हे करु ते करु, अशा फुशारक्या मारल्याशिवाय पदं मिळत नाहीत. माझ्यावर बोलल्याशिवाय शिवसेनेत पदं मिळत नाहीत, असं नारायण राणे म्हणाले. अजित पवारला अजून अज्ञान आहे. त्यांनी त्यांच्या खात्याचं पाहाव. मी अजून राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळलेलो नाही. एका रात्रीत आपल्यावरील केसेस आणि आरोप कशा काढायच्या हे अजित पवार यांच्याकडून शिकावं, असं नारायण राणे म्हणाले. माझ्याकडे सूक्ष्म, लघू आणि मध्यम खातं माझ्याकडं आहे. उद्योजक बनवणारा आणि रोजगार निर्माण करणारा विभाग आहे. दरडोई उत्पन्न वाढवणारा विभाग आहे. निर्यात वाढवणारा हा विभाग आहे. देशाचा जीडीपी वाढवणारा हा विभाग आहे. तरुणांना सांगेन की उद्योजक व्हा, आमच्या विभागातर्फे तुम्हाला मदत केली जाईल. अर्जांची छाननी करुन मार्गदर्शन करावं, अशा सूचना अधिकाऱ्यांना देतो, असं नारायण राणे म्हणाले.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें