मुख्यमंत्र्यांनी तो आदेश दिला अन् मी…; मंत्री अब्दुल सत्तार नेमकं काय म्हणाले?
Abdul Sattar : अवकाळी पावसाने पिकांचं मोठं नुकसान झालंय. या नुकसानीची पाहणी केल्यानंतर मंत्री अब्दुल सत्तार यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. पाहा...
नाशिक : अवकाळी पावसाने पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी केल्यानंतर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी माध्यमांशी संवाद साधला.”अस्मानी संकट आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून त्यांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. त्यानुसार पाहणा केली जातेय. शेतकऱ्यांना मदतही केली जात आहे, असं सत्तार म्हणाले. द्राक्ष, कांदे, टरबूज, भाजीपाला पिकांची पाहणी केली. अस्मानी संकट वेळ देऊन येत नाही. ज्या शेतकरी बांधवांच्या जीवावर राजकारण करतो त्याच्याशी बेइमानी केली नाही करणारही नाही. वस्तुनिष्ठ पंचनामे करून नुकसान भरपाईची घोषणा मुख्यमंत्री करतील. पंचनाम्यात एका गावाला मदत देता येत नसून राज्याच्या पॉलिसीचा विचार करावा लागतो, असंही सत्तार म्हणालेत.
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी

