नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद; महाजन-भुजबळांत रस्सीखेच!
नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळही या रेसमध्ये उतरलेत. नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून गिरीश महाजन आणि छगन भुजबळांमध्ये टोलेबाजी पाहायला मिळालीय.
नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्यापही कायम आहे. नाशिकचा पालकमंत्री मी होतोय, असं गिरीश महाजन यांनी म्हंटलं आहे. तर सात आमदार एकाच पक्षाचे असल्याच त्याच पक्षाला पालकमंत्रीपद मिळावं असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हंटलं आहे. त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी भुजबळ हे आग्रही असल्याचं बघायला मिळालं आहे.
नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळही या रेसमध्ये उतरलेत. नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून गिरीश महाजन आणि छगन भुजबळांमध्ये टोलेबाजी पाहायला मिळालीय. गिरीश महाजन यांनी धुळ्यात दहीहंडीच्या उत्सवात हजेरी लावली होती. यावेळी ते म्हणाले की, पावसाने बऱ्याच दिवसापासून दडी मारली होती. मात्र, आता पावसाच्या आगमन झालेले आहे. पाऊस सुरू असून देखील दहीहंडीच्या उत्सवासाठी तरुणाई रस्त्यावर उतरली आहे. मी दरवर्षी दहीहंडी उत्सवासाठी धुळ्याला येत असतो. नाशिकला देखील मी जात असतो, त्या ठिकाणी मी पालकमंत्री होत आहे, असा दावा त्यांनी केला आहे. तर छगन भुजबळ यांनी देखील यावर भाष्य केलं आहे. मला असे वाटते की, जसे रायगडमध्ये आमची एकच सीट आहे, तिथे आम्ही पालकमंत्रीपदाचा आग्रह धरतो. आमच्या लोकांना सांगेन की, सात आमदार सगळ्यात जास्त नाशिकमध्ये आहेत. त्यासाठी त्यांनी तेवढाच आग्रह धरावा, असं भुजबळ यांनी म्हंटलं आहे.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..

