Nashik IT Company Case | इम्तियाज जलील यांनी निदा खानला घर देण्यासाठी… नाशिक धर्मांतरण प्रकरणी शिवसेना नेत्याचं मोठं विधान
नाशिकच्या आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, धर्मांतराचा प्रयत्न आणि विनयभंग प्रकरणातील वॉन्टेड आरोपी निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे. निदा खान आणि तिच्या कुटुंबीयांना गुप्त माहितीच्या आधारे अटक करण्यात आली आहे
नाशिकच्या आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, धर्मांतराचा प्रयत्न आणि विनयभंग प्रकरणातील वॉन्टेड आरोपी निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे. निदा खान आणि तिच्या कुटुंबीयांना गुप्त माहितीच्या आधारे अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आता एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलला सहआरोपी करण्यात आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, निदा खानच्या अटकेनंतर सर्व MIM नेत्यांना पक्षाकडून छत्रपती संभाजीनगरात का बोलावलं जात आहे? असा सवाल संजय शिरसाट यांनी केला आहे.
नाशिक आयटी कंपनीतील धर्मांतरण रॅकेटची महिला सूत्रधार निदा खान हिला एमआयएमच्या मतीन पटेल याने तब्बल 42 दिवस स्वतःच्या घरात ठेवलं होतं. यावर शिवसेना शिंदे गटातील नेते संजय शिरसाट यांनी सांगितले की, ‘हा राजकीय मुद्दा नाही. माझं इम्तियाज जलील यांच्याशी वैर नाही. मात्र या प्रकरणात एमआयएमचे नेते का बोलत आहेत, कारण ते यामध्ये पूर्णपणे अडकलेले असतील. इम्तियाज जलील यांनीच मतीन पटेलला आरोपीला घरात लपवण्यास सांगितलं असेल, म्हणून ते बचावासाठी ती निर्दोष असल्याची विधानं करत आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास होईल, सरकार पोलिसांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे.’
Published on: May 09, 2026 01:29 PM
चादर धुतली अन् सापडलं Made in Pakistan! व्हायरल व्हिडिओने उडवली खळबळ
पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; भरधाव कारची दुचाकीला धडक
स्वारगेटमध्ये मनसेचा आक्रमक पवित्रा; एसीएफ स्टडी सेंटरवर धाड
म्हणून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी मिळाली, रोहित पवारा यांचा मोठा दावा

