Nashik Municipal Election: वयोवृद्ध इंदुबाई नागरे निवडणुकीच्या मैदानात… शेती करून प्रचार, नाशिकमध्ये का होतेय चर्चा?
नाशिक महानगरपालिका निवडणुकीतील शिवसेनेच्या वयोवृद्ध उमेदवार इंदुबाई नागरे लक्ष वेधून घेत आहेत. प्रभाग क्रमांक 10 मधून उभ्या असलेल्या इंदुबाई पहाटे गोठ्यातील गायींना चारा देतात आणि शेतात खुरपणी करतात. दैनंदिन शेतीची कामे आटोपूनच त्या प्रचारासाठी बाहेर पडतात, त्यांचा हा अनोखा प्रचार चर्चेचा विषय ठरला आहे.
नाशिकमध्ये सध्या महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या विविध उमेदवारांमध्ये प्रभाग क्रमांक 10 मधून शिवसेनेच्या वतीने निवडणूक लढवणाऱ्या इंदुबाई नागरे विशेष लक्ष वेधून घेत आहेत. त्या निवडणुकीतील सर्वात वयोवृद्ध उमेदवार म्हणून ओळखल्या जात आहेत. इतर उमेदवार सकाळी जॉगिंग ट्रॅकवर किंवा घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधत असताना, इंदुबाई नागरे यांची प्रचार करण्याची पद्धत मात्र हटके आहे. त्या दररोज पहाटे उठून आपल्या गोठ्यातील गायींना चारा घालतात आणि त्यांची सेवा करतात. यानंतर त्या शेतात खुरपणीची कामे आटोपतात. दैनंदिन शेतीची सर्व कामे पूर्ण केल्यानंतरच इंदुबाई प्रचारासाठी घराबाहेर पडतात आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. नाशिकमधील राजकारणात त्यांचा हा आगळावेगळा प्रचार नागरिक आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. गायींची सेवा आणि शेतीची कामे सांभाळून जनतेपर्यंत पोहोचण्याची त्यांची ही पद्धत अनेक उमेदवारांसाठी एक वेगळा आदर्श ठरत आहे.
6 पती-पत्नी निवडणुकीच्या रिंगणात, सांगली पालिकेच्या निवडणुकीची चर्चा!
...त्याचाच राग उद्धव ठाकरे यांनी धरला अन्.. संतोष धुरी यांचा नवा आरोप
लातूरमध्ये फडणवीसांचे डॅमेज कंट्रोल, देशमुखांच्या योगदानाला सलाम अन्..
उद्धव मामूंना खान, शेख चालतात, पण धुरी, देशपांडे नाही, साटम यांची टीका

