AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asaduddin Owaisi | निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप...

Asaduddin Owaisi | निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप…

| Updated on: May 09, 2026 | 4:29 PM
Share

नाशिक टीसीएसमधील लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणातील मुख्य आरोपी मानली जाणारी निदा खान अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. तब्बल 42 दिवस फरार असलेल्या निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर पोलीस आणि नाशिक पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ही अटक केली. अटकेनंतर निदा खानला शुक्रवारी नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, सध्या विशेष तपास पथकाकडून (SIT) तिची चौकशी सुरू आहे.

नाशिक टीसीएसमधील लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणातील मुख्य आरोपी मानली जाणारी निदा खान अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. तब्बल 42 दिवस फरार असलेल्या निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर पोलीस आणि नाशिक पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ही अटक केली. अटकेनंतर निदा खानला शुक्रवारी नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, सध्या विशेष तपास पथकाकडून (SIT) तिची चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील इतर आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी निदा खान प्रकरणावर भाष्य केले. “निदा खान एचआर विभागात काम करत नव्हती. एफआयआर दाखल होण्यापूर्वीच तिची बदली करण्यात आली होती,” असा दावा ओवैसी यांनी केला.
तसेच, “आरोप सिद्ध होईपर्यंत कोणालाही दोषी ठरवता येत नाही. कोर्ट न्याय करेल, असा आम्हाला विश्वास आहे. राजकीय द्वेषातून हे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे निदा खानला न्याय मिळेल आणि तिच्यावरील आरोप सिद्ध होणार नाहीत,” असेही ओवैसी म्हणाले. यावेळी त्यांनी मीडिया ट्रायलवरही टीका केली. “सध्या काही लोकांकडून मीडिया ट्रायल सुरू आहे. टीसीएस कंपनीतील तक्रारदार हा एका राजकीय पक्षाशी संबंधित आहे,” असा आरोपही त्यांनी केला. निदा खानवरील आरोप कोर्टात टिकणार नाहीत, असा दावाही ओवैसी यांनी केला.
दरम्यान, नाशिकमधील टीसीएस कंपनीत कथित धर्मांतरण आणि लैंगिक शोषण प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. आता निदा खानच्या अटकेनंतर या प्रकरणातील तपासाला वेग आला असून, एसआयटीकडून पुढील चौकशी सुरू आहे.

 

 

Published on: May 09, 2026 04:29 PM
Follow Us