‘तर OBC समाज पेटून उठेल’, राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून राज्य सरकारला थेट इशारा
VIDEO | मराठा आरक्षणाच्या मुद्यावर ठाम असणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासंदर्भात आज सर्वपक्षीय बैठक, मात्र आजच्या या बैठकीपूर्वीच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॅा. बबनराव तायवाडे यांच्याकडून राज्य सरकारला इशारा
नागपूर, ११ सप्टेंबर २०२३ | मराठा समाजाला सरसरक ओबीसी जात प्रमाणपत्र देऊ नये, या प्रमुख मागणीसाठी नागपुरातील कुणबी आणि ओबीसी समाजाच्या नेत्यांच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. या आंदोलनासंदर्भात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॅा. बबनराव तायवाडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाविरोधात आज राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचं आमरण उपोषण होत आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीविरोधात कुणबी-ओबीसींचं हे आंदोलन आहे. नागपूर, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ आणि राज्याच्या इतरही भागात हे आंदोलन सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. तर सरकारकडून ठोस आश्वासन मिळेपर्यंत ओबीसांचं आंदोलन सुरु राहणार असल्याचा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे. यासह आजच्या सर्वपक्षीय बैठकीत मनोज जरांगे पाटील यांची मागणी मान्य झाल्यास महाराष्ट्र पेटेल, असेही म्हणत डॅा. बबनराव तायवाडे यांनी सरकरला इशारा दिला आहे.
ठाकरेंनी समर्थकाला डावललं अन् फायर आजी थेट 'मातोश्री'वर
कुठं रडारड तर कुठं हमरी-तुमरी...तिकीट का नाकारलं? इच्छुकांचा राडा अन..
महापालिका निवडणुकीत AB फॉर्मवरून शिंदे गटाच्या शिवसेनेत राडा
कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीचे तिकीट

