Medical Shop Strike News | देशभरातील औषध दुकानदारांचा आज बंद; ऑनलाईन औषध विक्रीविरोधात केमिस्ट संघटनांचा संप, नागरिकांची मोठी गैरसोय
देशभरातील औषध विक्रेत्यांनी आज विविध मागण्यांसाठी एकदिवसीय बंद पुकारला असून, अनेक ठिकाणी औषधांची दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. ऑनलाईन आणि बेकायदेशीर औषध विक्रीविरोधात ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेने हा देशव्यापी संप आयोजित केला आहे.

केमिस्ट संघटनांच्या मते, ऑनलाईन औषध विक्रीमुळे छोट्या औषध विक्रेत्यांवर मोठा आर्थिक परिणाम होत आहे. तसेच बेकायदेशीर पद्धतीने औषधांची विक्री होत असल्यामुळे ग्राहकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होत असल्याचा आरोप संघटनांकडून करण्यात येत आहे. मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील विविध शहरांमध्ये या बंदला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक औषध दुकाने दिवसभर बंद राहणार असल्याने नागरिकांना औषधे मिळवण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, काही नागरिकांनी या संपाला विरोध दर्शवला असून अत्यावश्यक सेवांमध्ये औषध दुकानांचा समावेश असल्याने असा बंद टाळायला हवा, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
Published on: May 20, 2026 10:07 AM
उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात; पहा व्हिडीओ
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल
धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेता