‘त्या’ व्हायरल व्हीडिओवर खासदार संजय काका पाटील यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
खासदार संजय काका यांचा ईडी बाबतचा व्हीडिओ व्हायरल झाला. त्यानंतर संजय काका पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नवी दिल्ली : खासदार संजय काका पाटील यांचा ईडी बाबतचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. ईडी माझ्या मागे लागणार नाही. कारण मी भाजपचा खासदार आहे, असं संजय काका पाटील या व्हीडिओमध्ये म्हणताना दिसत आहेत. हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर संजय काका पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्या विरोधातील राजकीय षडयंत्र आखलं जात आहे. मला त्रास देण्यासाठी विरोधकांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. मोडतोड करून हा व्हीडिओ व्हायरल करण्यात आला आहे”, असा आरोप संजयकाका पाटील यांनी केला आहे. साखर कारखान्यांच्या कर्जाबाबत मी वक्तव्य केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समोर आणि पक्षासमोर माझी प्रतिमा मलिन व्हावी. यासाठी हा प्रयत्न केला जातोय, असं संजय काका पाटील म्हणाले आहेत.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

