Navratri 2024 : नवरात्रौत्सवाच्या पहिल्याच दिवशी वणीच्या गडावर सप्तश्रृंगीच्या दर्शनासाठी भाविकांची रिघ
नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. अशातच साडे तीन शक्तिपिठांपैकी एक असणाऱ्या सप्तश्रृंगी गडावर देखील भाविकांची रिघ पाहायला मिळाली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही नाशिक जिल्ह्यातील नांदुरी वणी येथील सप्तश्रृंगी देवीचा नवरात्र उत्सव सुरू झाला आहे. नाशिकच्या सप्तश्रृंगी गडावर आजपासून शारदीय नवरात्र उत्सवास सुरू झाल्याने साडे तीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या सप्तश्रृंगी गडावर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सप्तश्रृंगी गडावर नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशीच भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. भाविकांकडून कऱण्यात येत असलेल्या सप्तश्रृंगी मातेच्या नामस्मरण आणि जयघोषाने सप्तश्रृंगी गड हा दमदुमून गेल्याचे पाहायला मिळत आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी भाविकांची मोठी मांदियाळी बघायला मिळत असून गडाचा परिसर चैतन्य, उत्साहाने फुलून गेला आहे. दरम्यान, आज नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी सप्तश्रृंगी देवीला पूजा विधी करून साज शृंगार चढवण्यात आला आहे.
Latest Videos
Latest News