Nawab Malik | क्रूझ ड्रग्ज प्रकरणात भाजप नेत्यांच्या नातेवाईकांना का सोडलं? नवाब मलिकांचा सवाल
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलेले सर्व आरोप फेटाळताना एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी आम्ही जनतेचे सेवक आहोत, असं म्हटलं होतं. त्याला मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलेले सर्व आरोप फेटाळताना एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी आम्ही जनतेचे सेवक आहोत, असं म्हटलं होतं. त्याला मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. परमीबर सिंग आणि सचिन वाझेही जनतेचे सेवक होते, असा पलटवार नवाब मलिक यांनी केला आहे.
नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना हा पलटवार केला आहे. परमबीरसिंग देखील जनतेचा सेवक होता. शर्मापण जनतेचे सेवक होते. वाझेही जनतेचे सेवक होते. परंतु देशसेवा न करता हे दुसरे धंदे करत होते. हा व्यक्तीदेखील त्यातील आहे. हळूहळू याचा सगळा खुलासा करणार असल्याचा गौप्यस्फोट मलिक यांनी केला आहे.
भाजप नेत्याच्या मेहुण्याला का सोडले?
क्रुझवरील कारवाईमध्ये 10 लोकांना पकडलं होते, मात्र त्यापैकी 2 लोकांना सोडले असल्याचे समोर आले आहे. जे दोघे सोडण्यात आले त्यामध्ये भाजपच्या एका नेत्याचा मेहुणा असून याबाबतचा भांडाफोड उद्याच्या पत्रकार परिषदेत करणार असल्याचा दावा त्यांनी केला. त्या दोन लोकांना NCB कार्यालयात आणण्यात आले होते आणि काही तासांनी त्यांना सोडण्यात आले आहे. हे जाणीवपूर्वक करण्यात आले आहे. सगळा प्रकार समोर येईल म्हणून त्यांना सोडण्यात आले आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे, असेही ते म्हणाले.
Published on: Oct 08, 2021 11:59 AM
राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही....
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची...
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं..
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद,

