भाजप महाराष्ट्रात सत्तेत येण्याचं स्वप्न बघतंय, त्यांचं स्वप्न पूर्ण होणार नाही: नवाब मलिक

निश्चितच देशामध्ये भाजप विरहित आघाडी करण्यासाठी शरद पवार प्रयत्नशील आहेत. विरोधी पक्षांची मूठ बांधण्याचा प्रयत्न पवार यांच्याकडून केला जातोय, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले. 

मुंबई:  शरद पवार उद्या  काही विरोधी पक्षाच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. निश्चितच देशामध्ये भाजप विरहित आघाडी करण्यासाठी शरद पवार प्रयत्नशील आहेत. विरोधी पक्षांची मूठ बांधण्याचा प्रयत्न पवार यांच्याकडून केला जातोय, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले.  विरोधी पक्षांची आघाडी तयार करण्यासाठी चर्चा केली जाणार आहे. या बैठकीमध्ये आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस यांच्यासह काही पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत, असंही ते म्हणाले.

प्रशांत किशोर यांनी मुंबईतल्या भेटीनंतर यांच्या मुंबईतल्या भेटीनंतर दिल्लीतही पुन्हा पवार साहेबांची भेट घेतली. निश्चितच त्यामध्ये काही चर्चा झाली असू शकते .पण ही भेट राजकीय संदर्भात असेल असं वाटत नाही, असं मलिक म्हणाले.  भाजप सत्तेत येण्याची स्वप्न बघत आहे. पण, हे स्वप्न पूर्ण होणार नाही .महा विकास आघाडी सरकार भक्कमपणे काम करत आहे. या सरकारला कुठलीही अडचण होणार नाही, असं नवाब मलिक म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI