NCP : ‘ती’ घटना गंभीर अन् निंदनीय… पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या असभ्य वर्तनावर अजित दादा स्पष्टच म्हणाले…
राष्ट्रवादी पक्षाची ओळख शिवराय, शाहू महाराज, महात्मा फुले, बाबासाहेबांच्या विचारांवर उभी असं म्हणत मारहाणीच्या घटनेवर अजित पवार यांच्याकडून एक निवेदन जारी करण्यात आलं आहे.
लातूरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना जबर मारहाण केल्याप्रकरणी एक मोठी कारवाई करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यासह तब्बल १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूर शहरातील विवेकानंद पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला झालेल्या मारहाण प्रकरणी अजित पवारांनी एक निवेदन दिलं असून राष्ट्रवादी आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये घडलेली घटना गंभीर, दुर्दैवी, निषेधार्ह आणि निंदनीय असल्याचे म्हणत कोणत्याही हिंसेला असभ्य वर्तनाला किंवा असंसदीय भाषेला मी विरोध करतो, असं अजित पवार म्हणाले. इतकंच नाहीतर समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय मागण्यांचा आणि भावनांचा सन्मान करतो, कार्यकर्त्यांनी सामाजिक जीवनात काम करताना लोकशाही, शांतता आणि अहिंसेला प्राधान्य द्यावं, असंही अजित पवार म्हणाले.
Published on: Jul 21, 2025 02:17 PM
विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या
उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना
भाजपसोबत जाणाच्या विचारात असलेल्यांना ठाकरेंचा सवाल; दानपेटीची चोरी...
भक्तीचा महासंगम! ज्ञानोबा-तुकाराम पालखीचे आगमन; वारकरी-धारकरी एकत्र
