धनंजय मुंडेंवर कारवाई कधी ? अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका
काल धनंजय मुंडे, प्रपुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांच्यासोबत अजित पवारांची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये अजित पवार हे मुडेंबाबतच्या भूमिकेवर ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे
धनंजय मुंडे जोपर्यंत ठाम ठरत नाहीत तोपर्यंत कारवाई नाही अशी ठाम भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काल धनंजय मुंडे, प्रपुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांच्यासोबत अजित पवारांची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये अजित पवार हे मुडेंबाबतच्या भूमिकेवर ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी आपली भूमिका धनंजय मुंडे यांच्यासमोर मांडल्याची माहिती देखील मिळत आहे.
काल रात्री देवगिरीवर धनंजय मुंडे दाखल झाले, त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख नेतेही उपस्थित होते. या बैठकीत अजित पवारांनी थेट रोखठोक भूमिका मांडली. जोपर्यंत धनंजय मुंडे हे दोषी आढळत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यावर पक्षाकडून कोणतीच कारवाई करण्यात येणार नाही.

ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका

अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला

'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य

डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
