अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा संभाव्य यादी
महायुतीचे जागावाटप जाहीर झालेले नसताना आता अजित पवार गटाच्या संभाव्य 20 उमेदवारांची यादी समोर आली आहे. अजित पवार गटाची नुकतंच पक्षांतर्गत बैठक पार पडली. या बैठकीला अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी बैठकीत 20 उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर झाली नसली तरी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. अशातच महायुतीचे जागावाटप जाहीर झालेले नसताना आता अजित पवार गटाच्या संभाव्य २० उमेदवारांची यादी समोर आली आहे. अजित पवार गटाचे संभाव्य २० उमेदवार ठरले आहेत. यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी थेट लढत होताना दिसत आहे. सध्या या दोन्ही घटक पक्षांच्या बैठका पार पडत आहेत. दुसरीकडे पक्षांतर्गत बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संभाव्य २० उमेदवारांसंदर्भातील अंतिम निर्णय झाल्याची माहिती मिळतेय. तर अजित पवारच बारामतीतून लढणार असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले आहे. अजित पवार गटाची नुकतंच पक्षांतर्गत बैठक पार पडली. या बैठकीला अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या संभाव्य 20 उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती मिळतेय. बघा कोण कुठून लढणार?