Praful Patel | राष्ट्रवादीत पुन्हा वादाची ठिणगी! प्रफुल्ल पटेलांच्या सभेत अजित पवारांचा फोटो नाहीच…
सध्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील वाद अगदी चव्हाट्यावर आल्याचं दिसत आहे. काही ठिकाणी पक्षात वेगवेगळे मतप्रवाह आढळून येत आहेत तर प्रमुख नेत्यांमध्येही विवाद सत्र सुरुच आहेत. आता राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. नेमकं काय घडलं?

अलीकडेच प्रफुल्ल पटेल यांची तिरोडामध्ये एक सभा पार पडली. या सभेतील बॅनरवर अजित पवारांचा फोटो नव्हता. यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी ‘तटकरे, पटेलांनी स्वतंत्र पक्षात असल्याचं दाखवून दिलं’ अशी सूचक पोस्ट केली. पुढे ते ‘पक्ष ताब्यात घेण्याचे मनसुबे कुठे ना कुठे दिसून येत आहेत’ असं देखील म्हणाले. लवांडेंच्या या पोस्टवर प्रफुल्ल पटेलांनी बोलणं टाळलं तरी नवीन वाद पेटल्याचं स्पष्ट दिसून येत आहे.
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह..
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात..
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर..