Rupali Thombre Patil Video : पुण्यात सिग्नलवरच अश्लील चाळे, रूपाली ठोंबरे पाटील आक्रमक, ‘निर्लज्जपण, जसं काय त्याच्या बापाचा…’
गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यात स्वारगेट एसटी डेपो परिसरात एका बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेनंतर आता मद्यधुंद अवस्थेतील तरूणाने पुण्यातील शास्त्रीनगर चैकातील सिग्नलवर अश्लील चाळे केल्याचे समोर आले आहे.
पुण्यातील येरवडा भागांमध्ये शास्त्रीनगर चौकात स्त्रियांच्या समोर एका तरूणाने हे अश्लील चाळे केले. हा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत असून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत आहे. या संतापजनक प्रकारावर राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘शिवशाही बसमध्ये जो प्रकार झाला त्या घटनेतील आरोपीला कायद्याने कडक शिक्षा देण्यात येणार आहे. पुण्यातील शास्त्रीनगर भागात तरूणाने जे अश्लील चाळे केले. हा तरूण बड्या बापाचा मुलगा दिसतोय पण त्याला काही संस्कार नाहीये. जसं काय त्याच्या बापाचा रस्ता असल्यासारखं तो उभं राहून लघूशंका करतोय. लाज वाटली पाहिजे. पण ज्यांनी व्हिडीओ काढला त्याने जाब विचारणं गरजेचं होतं त्याच ठिकाणाहून पोलिसांच्या ताब्यात त्याला द्यायला हवं होतं. ही विकृत लोकं आहेत. पुण्यात येणारा लोंढा हा त्यांच्या मर्जीप्रमाणे राहिला लागला आहे.’, अशी संतापजनक प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी दिली. तर आजकालची पिढी बिघडण्याचं कारण म्हणजे त्यांच्यावर कोणतंही बंधन नाहीये. हा व्हिडीओ म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे यावर कारवाई झाली पाहिजे आणि अशा विकृत मानसिकतेच्या लोकांना ठेचून काढलं पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.