उद्धव ठाकरे यांचं ‘हे’ काम आवडलं आपल्याला!; अजित पवार यांच्याकडून कौतुक
Ajit Pawar on Uddhav Thackeray : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. ते अहमदनगरमध्ये बोलत होते. पाहा...
अहमदनगर : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं. तेव्हा त्यांनी आम्ही चांगलं काम केलं. आम्ही सत्तेत आल्यानंतर लगेचच कोरोना आला. या कोरोनाकाळात उद्धव ठाकरे यांची भूमिका महत्वपूर्ण होती. लसीकरण, बूस्टर डोस, अॅम्ब्युलन्स यांची योग्य व्यवस्था केली गेली, असं अजित पवार म्हणाले. अहमदनगरच्या एका हॉस्पिटलच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. मी हॉस्पिटलचं उद्घाटन केलं आहे. मात्र ढिगाने पेशंट यावेत, अशी माझी अजिबात भावना नाही. आरोग्याच्या चांगल्या सवयी लावा. व्यायाम करा, असा सल्ला अजित पवार यांनी दिला आहे.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

