Dhananjay Munde On BJP | धनंजय मुंडे यांचा भाजप सरकारवर निशाणा – tv9

अस्लम अब्दुल शानेदिवाण, Tv9 मराठी

|

Updated on: Aug 21, 2022 | 9:46 AM

आजचे केंद्रातील भाजप सरकार हे स्वतःच्या खुर्च्या, स्वतःची सत्ता वाचवण्यासाठी या तपास यंत्रणांचा वापर करत आहे असे धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आक्रमक नेते धनंजय मुंडे यांनी आज भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच मुंडे यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या दुरुपयोगावरून भाजप सरकारवर टीका केली आहे. यावेळी मुंडे म्हणाले, मोदी सरकार हे काही आज केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करत आहे असे नाही. गेली साडेसात वर्षे झाली मोदी सरकार हे केंद्रातील तपास यंत्रणांचा दुरुपयोग करत आहे. त्याचबरोबर त्यांनी असेही म्हटलं आहे की, सध्याचे सरकार हे ही ईडीचेच आहे. ई म्हणजे एकनाथ शिंदे आणि डी म्हणजे देवेंद्र फडणवीस. हे ईडीचे सरकार म्हणजे फक्त योगायोग आहे. तसेच मागचा इतिहास जर पाहिला तर केंद्रीय तपास यंत्रणांचा देशाच्या सुरक्षेसाठी वापर केला जायचा. मात्र आजचे केंद्रातील भाजप सरकार हे स्वतःच्या खुर्च्या, स्वतःची सत्ता वाचवण्यासाठी या तपास यंत्रणांचा वापर करत आहे.

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI