विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी; दादांच्या राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी टिंगरे, लांडे, तटकरे मैदानात, कोणाला मिळणार तिकीट?
विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 16 जागांसाठी लवकरच निवडणूक होणार असून, राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन महत्त्वाच्या जागा लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे. विशेषतः पुणे तसेच रायगड-रत्नागिरी मतदारसंघांवर पक्षाने लक्ष केंद्रीत केल्याचं दिसत आहे.

पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून अनेक इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. यामध्ये आमदार सुनील टिंगरे, विक्रम काकडे, माजी आमदार रमेश आप्पा थोरात, माजी आमदार विलास लांडे आणि नाना काटे यांची नावे चर्चेत आहेत.
तर रायगड आणि रत्नागिरी मतदारसंघासाठी माजी आमदार अनिकेत तटकरे, राजीव साबळे आणि अजित यशवंतराव यांनी इच्छुकता दर्शवली आहे. त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार याकडे आता पक्षातील कार्यकर्ते आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून रणनीती आखण्यास सुरुवात झाली असून आगामी काळात राजकीय समीकरणे अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
Published on: May 19, 2026 11:08 AM
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द