NCP | लवकर आटपा बोलणं झोंबलं… भुजबळ आणि तटकरेंची सुनेत्रा वहिनींसमोरच जुंपली
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी आणि मतभेद पुन्हा एकदा समोर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पक्षाच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत वरिष्ठ नेते छगन भुजबळ आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. बैठकीदरम्यान वातावरण काही काळ तणावपूर्ण झाल्याचंही सांगितलं जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, सुनील तटकरे यांनी बैठकीत बोलताना अजित पवारांच्या निधनानंतर आम्हीच टीकेचे धनी का? असं म्हणत तटकरे संतापल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याचवेळी छगन भुजबळ यांनी “लवकर आटपा,” अशी टिप्पणी केल्याने दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याची चर्चा आहे.
दरम्यान, मुंबईत उपस्थित असूनही काही महत्त्वाचे नेते बैठकीला अनुपस्थित राहिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच सुनील तटकरे यांचं भाषण सुरू होण्यापूर्वीच पार्थ पवार यांनी बैठकीतून काढता पाय घेतल्याचंही समोर आलं आहे. या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर कायम असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.
Published on: May 27, 2026 10:29 AM
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
आधी शिंदेंकडून मोठ्या गिफ्टच्या चर्चा आता थेट मुख्यंमंत्र्यासोबत... ओम