अमरावतीत कांटे की टक्कर बघायला मिळणार? ननवीत राणा यांच्या विरोधात बच्चू कडू होतेच आता राष्ट्रवादीही?

| Updated on: Jun 05, 2023 | 10:26 AM

ही जागा कोणाकडे जाणार अशी जोरदार चर्चा रंगली असतानाच बच्चू कडू यांनी आपली तयारी झाली असून उमेदवार ही समोर आणला होता. त्यानंतर आता याच मतदारसंघावरून आता राष्ट्रवादीनेही आपला दावा सांगितला आहे. त्यामुळे खासदार नवनीत राणा यांच्यासमोर आता पेच निर्माण झाला आहे.

Follow us on

अमरावती : येथील लोकसभा जागेवरून याच्या आधीच प्रहारचे संघटनेचे आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात चांगलीच जुंपली होती. त्यानंतर ही जागा कोणाकडे जाणार अशी जोरदार चर्चा रंगली असतानाच बच्चू कडू यांनी आपली तयारी झाली असून उमेदवार ही समोर आणला होता. त्यानंतर आता याच मतदारसंघावरून आता राष्ट्रवादीनेही आपला दावा सांगितला आहे. त्यामुळे खासदार नवनीत राणा यांच्यासमोर आता पेच निर्माण झाला आहे. सध्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या तयारीसाठी शरद पवार विभागवार बैठका घेत आहेत. विदर्भातही या बैठका होणार आहेत. यावेळी अमरावरती लोकसभा निवडणुकीवरून चर्चा होणार आहे. तर अमरावरती लोकसभा निवडणुकीत खा. ननवित राणा यांच्या विरोधात राष्ट्रवादी निवडणूक लढवणार आहे. तर त्याची चाचपणी सुरु असल्याचे राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे. यावेळी त्यांनी या जागेवर जरी काँग्रेसने दावा केला असला तरी वरिष्ठ स्तरावर चर्चा झाल्यानंतर मतदारसंघ अदलाबदल करण्याबाबत निर्णय होईल आणि ही जागा राष्ट्रवादीला मिळेल असे संकेत दिले आहे.