‘एकनाथ शिंदे यांच्या बॅगांवर लक्ष ठेवलं असतं तर…’, संजय राऊत यांना कुणाचा टोला?
VIDEO | संजय राऊत यांना हे सर्व आताच उकरून काढायची गरज काय?, 'सामना'तील अग्रलेखावर राष्ट्रवादीच्या नेत्यानी संतप्त प्रतिक्रिया
नाशिक : ‘सामना’च्या अग्रलेखातून पहिल्यांदाच शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या उणीवा दाखवण्यात आल्या आहेत. शरद पवार हे राजकीय वारस निर्माण करण्यात अपयशी ठरल्याचंही अग्रलेखातून म्हणत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकात जे म्हटलं, त्यावर उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मला महाविकास आघाडीत बिघाडी करायची नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. असं असताना संजय राऊत यांना हे सगळं उकरून काढायची काय गरज आहे? त्यांना असं वाटतं का, की राष्ट्रवादी महाविकास आघाडीतून बाहेर पडायला पाहिजे, मनभेद निर्माण व्हावेत? असा सवालही छगन भुजबळ यांनी यावेळी केला आहे. तर तुमचं जेवढं आयुष्य आहे, तेवढं शरद पवार साहेबांचं राजकारण आहे. राष्ट्रवादीमध्ये सुद्धा अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील असे नेतृत्व करणारे नेते आहेत. ते कुणाच्या घरात गेले होते, त्यांना माहीत. इतकं लक्ष त्यानी शिंदे ग्रुप आणि त्यांच्या बॅगवर ठेवले असते, तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती, असा टोलाही भुजबळ यांनी लगावला आहे. यानंतर आता महाविकास आघाडीमध्येच सर्व काही अलबेल नसल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे.
Published on: May 08, 2023 01:19 PM
जेजुरीत भरधाव टेम्पोने वारकऱ्यांनाच चिरडलं, आकडा आला समोर
मुंबईत संतापजनक घटना! चिमुकलीवर वॉचमनकडून अत्याचार, नराधम अटकेत
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणी
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवर
