AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jayant Patil | मराठा आरक्षणाची लढाई संसदेत जावी : जयंत पाटील

Jayant Patil | मराठा आरक्षणाची लढाई संसदेत जावी : जयंत पाटील

| Edited By: | Updated on: Jun 10, 2021 | 8:16 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP Jayant Patil) यांनी मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) लढाई संसदेत जावी, अशी आशा व्यक्त केली (NCP Leader Jayant Patil on Maratha Reservation).

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP Jayant Patil) यांनी मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) लढाई संसदेत जावी, अशी आशा व्यक्त केली. विशेष म्हणजे मराठा आरक्षणासाठी महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ नुकतंच दिल्लीला जावून आलं. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचा समावेश आहे. या तीनही मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन मराठा आरक्षणविषयावर चर्चा केली. मराठा आरक्षण हे फार महत्त्वाचं आणि गंभीर विषय आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, अशी सर्व समाजाची भावना आहे. आता ही लढाई संसदेत गेली पाहिजे. संसदेत घटनेत काही बदल केले पाहिजे हे सांगण्यासाठी महाविकास आघाडीचे मंत्री दिल्लीला जावून आले, असं जयंत पाटील म्हणाले (NCP Leader Jayant Patil on Maratha Reservation).

Follow Us