Jitendra Awhad Tweet Video : ‘ते घरी आले, म्हणाले तुला ठार मारणार…’, वाल्मिक कराडचा उल्लेख अन् महादेव गित्तेकडून गंभीर आरोप
जितेंद्र आव्हाड यांच्याकडून बापू आंधळे हत्या प्रकरणातील एक व्हिडिओ ट्वीट करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्याकडून महादेव गित्तेचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून बापू आंधळे हत्या प्रकरणातील एक व्हिडिओ ट्वीट करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्याकडून महादेव गित्तेचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून माझ्यावर हल्ला झाला असे म्हणत महादेव गित्तेने हा गंभीर आरोप केला आहे. गेल्या वर्षी जून महिन्यातील सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरण. 29 जून 2024 रोजी परळीतील मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणी पवार गटाचे बबन गित्ते आणि वाल्मिक कराड यांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले. बापू आंधळे हत्या प्रकरणी आठ जणांना अटक करून न्यायालयात कोठडी सुनावण्यात आली. बबन गित्ते मात्र अद्याप फरार तर वाल्मिक करडला ठोस पुराव्या अभावी सोडण्यात आलं. जितेंद्र आव्हाड यांच्याकडून बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी महादेव गित्तेचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून गोळीबार झाल्याचा महादेव गित्तेनी गंभीर आरोप केला आहे. बघा व्हिडीओ
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

