Jitendra Awhad Video : ‘राज ठाकरेंचं अभिनंदन, बोलायला हिंमत लागते…’. सलाम करत आव्हाडांनी केली ‘त्या’ वक्तव्यावरून मिमिक्री
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल महाकुंभच्या स्नान आणि गंगाजल याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून भाजप नेते आक्रमक झाले आहेत. यावरून जितेंद्र आव्हाडांनी त्यांची मिमिक्री केली आहे.
मनसेच्या वर्धनपदिनाच्या कार्यक्रमातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुंभमेळ्यातील स्नानावरून एक वक्तव्य केलं. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. राज ठाकरे यांनी बाळा नांदगावकर यांनी महाकुंभमधून आणलेल्या गंगाजलबद्दल बोलताना उपरोधकपणे टीका केल्याचे आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी गंगेतल्या प्रदूषणाबद्दल टीकास्त्र डागत राज ठाकरेंनी नाव न घेता भाजपच्या गंगा स्वच्छतेच्या मोहिमेवरचं सवाल केला आहे. यानंतर भाजपचे नेतेही राज ठाकरे यांच्या त्या वक्तव्यावरून आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. अशाच शरद पवार गट राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंचा चांगलाच खरपूस समाचार घेतला आणि माध्यमांच्या प्रतिनिधींसमोरच मिमिक्री करत थेट राज ठाकरेंना सलामच ठोकला. ‘राज ठाकरेंनी भरसभेत बोलत असताना जी नक्कल केली. ती आम्ही केली असती तर आतापर्यंत आमच्या घरावर मोर्चे, दगडफेक झाली असती. आम्ही देशद्रोही ठरलो असतो. भारतात सगळ्यांना आपली मतं व्यक्त करण्याचं स्वातंत्र आहे. मी तर राज ठाकरेंचं अभिनंदन करेन. असं काही हिंमतीने बोलणारा माणूस महाराष्ट्रात आहे. हिमंत लागते हे सगळं बोलताना…आम्ही बोलायला पण घाबरतो. जे भारतीयांच्या मनात आहे ते राज ठाकरेंनी बोलून दाखवलं. त्यांना माझा सलाम आहे’, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

