Jitendra Awhad Video : ‘औरंगजेब तुमचा बाप की तुम्ही त्याच्या खानदानातले… त्याला आता पोसायला घेतलंय’, आव्हाड कोणावर भडकले?
औरंगजेबाची कबर हटवण्यावर सुनील आंबेकर यांनी आजच्या काळात मुघल सम्राट प्रासंगिक नाही. तसेच कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराला प्रोत्साहन दिले जाऊ शकत नाही. असे म्हटले या भूमिकेचे आव्हाडांनी कौतुक केले
छत्रपती संभाजीनगर येथील खुलताबाद येथे असणाऱ्या मुघल शासक औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी सोमवारी नागपूर शहरात झालेल्या निदर्शनानंतर हिंसाचार उसळला. या हिंसाचारादरम्यान जमावाने पोलिसांवर हल्ला केल्याने ३० हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले. आज बुधवारी पोलिसांनी नागपूर हिंसाचाराचा मास्टमाईंड असणाऱ्या संशयित फहीम खान याला अटक केली. त्याला २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, औरंगजेबावरील वादाच्या पार्श्वभूमीवर, आरएसएसचे प्रवक्ते सुनील आंबेकर यांनी कोणत्याही प्रकारची हिंसाचार समाजासाठी चांगली नसल्याची प्रतिक्रिया दिली. यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावर भाष्य केले. ‘उशिरा का होईना आरएसएसने ही भूमिका घेतली हे खूप महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रात जाळपोळ, द्वेष पसरवून त्यातून राजकीय पोळी भाजून घ्यावी असा प्रयत्न काही राजकीय नेते मंडळी करत असतानाच आरएसएसची भूमिका हे महाराष्ट्राच्या हिताचं आहे. कारण जर हे झालं नसतं तर महाराष्ट्रात आगी लागल्या असतात’, अशी शक्यता आव्हाडांनी वर्तविली.
‘तुम्हाला इतिहास माहिती नाही आणि कशाप्रकारे भाषणं आणि वक्तव्य करताय. तुम्हाला इतिहास पुसता येणार नाही. हा इतिहास पुसण्याचं कामं करत असताना त्यात शिवरायांची उंची कमी करताय. खुलताबाद येथे असणारी औरंगजेबाची कबर ही आपल्या शैर्याची पराक्रमाची निशाणी आहे. पण तुम्हासा महाराजांचा इतिहास आणि शौर्य मिटवायचंय हेच सत्य आहे’, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हणत सध्यस्थितीवर बोलताना संताप व्यक्त केला.

पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल

दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय

साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा

मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?
