Rohit Pawar | शरद पवार केंद्र स्तरावर पाठपुरवठा करतायेत, 10 ते 12 दिवसात मदत जाहीर होण्याची अपेक्षा

महापुरामुळे ग्रामीण आणि शहरी भागात झालेल नुकसान वेगळं आहे. त्यामुळे त्या त्या पातळीवर लोकांना मदत मिळाली पाहिजे असं देखील रोहित पवार म्हणाले. कोल्हापूर जिल्ह्यातील महापुरानंतर नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी रोहित पवार जिल्हा दौर्‍यावर आले आहेत.

कोल्हापूर :  2019 ला आलेल्या महापुरावेळी नुकसान भरपाई देताना वेगवेगळ्या अटी घातल्या गेल्या. त्याचा फायदा कोणाला झाला नाही. ऑफिसमध्ये बसून निर्णय घेतले की असंच होणार अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. महापुरामुळे ग्रामीण आणि शहरी भागात झालेल नुकसान वेगळं आहे. त्यामुळे त्या त्या पातळीवर लोकांना मदत मिळाली पाहिजे असं देखील रोहित पवार म्हणाले. कोल्हापूर जिल्ह्यातील महापुरानंतर नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी रोहित पवार जिल्हा दौर्‍यावर आले आहेत. त्यांनी आज सिद्धार्थनगर परिसरात महापुरामुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी केली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI