Saroj Ahire Video : ‘दादा… मला काम करताना त्रास होतो’, मित्रपक्षांचा उल्लेख करत महिला आमदारानं केली अजित पवारांकडे तक्रार
'मला अनेक प्रकारचा त्रास होत असून माझ्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जातोय', असं म्हणत सरोज अहिरे यांनी अजित दादांसमोरच आपली नाराजी व्यक्त केली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना नेत्यांकडून त्रास होत असल्याची तक्रार राष्ट्रवादीच्या आमदाराने अजित पवार यांच्याकडे केल्याची माहिती समोर येत आहे. ‘मला अनेक प्रकारचा त्रास होत असून माझ्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जातोय’, असं वक्तव्य सरोज आहिरे यांनी केलं. इतकंच नाहीतर आम्ही मित्रपक्षाचा धर्म पाळतो तर मित्रपक्षांच्या नेत्यांनाही शिस्त पाळायला सांगा, असं म्हणत सरोज अहिरे यांनी अजित दादांसमोरच आपली नाराजी व्यक्त केली आहे. ‘मी महिला आमदार म्हणून मला त्रास होतोय. याला काही नेते साक्षीदार आहेत. मी एखादं काम मंजूर करून आणायचं आणि परस्पर त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही मित्रपक्षाचा धर्म पाळतो तर मित्रपक्षांच्या नेत्यांनाही शिस्त पाळायला सांगा. महायुतीत मला वाद घडवून आणायचा नाहीये’, असं सरोज आहिरे यांनी जाहीरपणे बोलून दाखवलं तर यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी आमदार सरोज आहिरेंच्या पाठिशी आहे. मतदारसंघात कुठलीही गोष्ट कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही तुमच्या मतदारांच्या साक्षीने देतो.’, असं अजित पवार म्हणाले.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

