पुन्हा सत्तेत येण्यासाठी शरद पवारांना फक्त एकाच महाराष्ट्र दौऱ्याची गरज? सुप्रिया सुळे यांचं मोठं विधान

पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रात सत्तेत येण्यासाठी शरद पवारांचा फक्त एक दौरा पुरेसा आहे?

सिद्धेश सावंत

|

Sep 29, 2022 | 9:17 AM

राहुल ढवळे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, इंदापूर, पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. शरद पवारांचा एक महाराष्ट्राचा दौरा झाली की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. त्या इंदापूरमध्ये (Supriya Sule in Indapur) आयोजित एका कार्यक्रमात बोलत होत्या. विरोधात असताना शरद पवारांना महाराष्ट्राने सर्वात जास्त प्रेम दिलं, असंही त्यांनी म्हटलंय. शरद पवार यांनी राजकारण आणि समाजकारणात 55 वर्षांच्या कार्यकाळात सर्वाधिक चढ उतार पाहिले. जेवढे चढ आले, तेवढेच उतारही त्यांच्या अनुभवाला आले. 27 वर्ष सत्तेत आणि 27 वर्ष विरोधात गेली. मी त्यांना नेहमीच सांगते की महाराष्ट्राने तुम्हाला प्रेम दिलंच, पण विरोधात असतना महाराष्ट्राने तुम्हाला सर्वात जास्त प्रेम दिलं, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. संपूर्ण महाराष्ट्राने हे पाहिलंय की, शरद पवार विरोधात गेले की ते दौऱ्यावर निघतात, असंही सुप्रिया सुळेंनी नमूद केलं. पण त्या दौऱ्यामध्ये काय गंमत होते माहीत नाही, काही दिवस एक महाराष्ट्राचा दौरा झाला की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात, असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केलं.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें