AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | ना अजित दादा... ना सुप्रिया ताई... 'सुप्रीमो' शरद पवारच! राजकीय खेळी संपली की आता सुरू झाली?

Special Report | ना अजित दादा… ना सुप्रिया ताई… ‘सुप्रीमो’ शरद पवारच! राजकीय खेळी संपली की आता सुरू झाली?

| Updated on: May 06, 2023 | 8:01 AM
Share

VIDEO | शरद पवारांनी भाकरी फिरवण्याचं सांगत राजीनामा दिला अन् तो दोन दिवसांत मागेही घेतला, पडद्यामागे नेमकं काय घडतंय? बघा स्पेशल रिपोर्ट

मुंबई : अजित पवारांना 8 एप्रिलच्या दरम्यान पित्ताचा त्रास झाला. त्या त्रासानंतर अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत जाण्याच्या चर्चांची सुरुवात झाली. विचारधारांच्या जर-तरच्या अटीवर शिंदे-भाजपच्या नेत्यांनी जाहीरपणे अजित पवारांना ऑफरही दिली. इकडे शरद पवारांनी भाकरी फिरवण्याचं सांगत राजीनामा दिला. त्यानंतर 2 दिवसांच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर मागेही घेतला. ‘मै राजनीती छोडना चाहता हुँ…..पर राजनिती मुझे नहीं छोडती….’, हे देशाचे दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं गाजलेलं वाक्य आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना लागू पडतं. शरद पवारांनी राजीनामा दिला, तो राजीनामा मंजुरीचे अधिकार पवारांनीच सूचवलेल्या एका कमिटीला गेले. दोन-चार लोक सोडली तर कमिटीतलं बहुमत हे आधीच पवारांच्या बाजूनं होतं. राजीनाम्याविरोधात खासकरुन तरुण कार्यकर्त्यांचा राग उफाळून आला आणि 7 दिवसांपूर्वी भाकरी फिरवण्याचा जो चेंडू पवारांनी टोलवला होता, तोच आता माघारी घ्या म्हणून पुन्हा पवारांच्याच कोर्टात पोहोचला.

सोहळा पुस्तक प्रकाशनाचा होता, पुस्तकाचं नाव ”लोक माझे सांगाती” त्याच कार्यक्रमात पक्षातले लोक शरद पवारांच्याच सोबतीला आहेत, हे त्यांच्या राजीनाम्यानं दाखवलं. शरद पवारांनी आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यातच आयुष्यात असं नवं पान जोडलं की जो एक स्वतंत्र पुस्तकाचा विषय होऊ शकतो. आता राजीनाम्याचा भाग अलहिदा. पण मंजूर न झालेल्या राजीनाम्यानं किती गणितं साधली गेली, याचीही चर्चा रंगतेय. बघा याबाबतचा स्पेशल रिपोर्ट…

Published on: May 06, 2023 08:00 AM