अनेकांना झटका! शरद पवार बेंगळुरूला रवाना; विरोधकांच्या बैठकीला लावणार हजेरी
गेल्या दोन दिवसात अजित पवार गटाच्या मंत्र्यांनी आणि त्यानंतर आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ राहण्यासाठी पवार यांनी पुन्हा एकदा विचार करवा अशी विनंती केली होती.
नागपूर, 18 जुलै 2023 | महाराष्ट्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या राजकीय उलथा पालथ होताना दिसत आहे. तर गेल्या दोन दिवसापासून पुन्हा एकदा राष्ट्रवादीत जोरदार हालचाली होताना दिसत आहेत. गेल्या दोन दिवसात अजित पवार गटाच्या मंत्र्यांनी आणि त्यानंतर आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ राहण्यासाठी पवार यांनी पुन्हा एकदा विचार करवा अशी विनंती केली होती. तर याच दरम्यान बंगळुरुमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखाली 26 विरोधी पक्ष एकत्र पुन्हा एकत्र येणार आहेत. त्यांची महत्वाची बैठक पार पडणार असून भाजपला सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता मिळवण्यापासून रोखण्यासाठी डिनर डिप्लोमसी झाली. मात्र त्याला पवार गेले नाहीत. त्यामुळे ते या बैठकीला जाणार नाहीत असे म्हटलं जात होतं. याचदरम्यान आता शरद पवार हे या बैठकीला रवाना झाले आहे. याच्यााधी 23 जून रोजी पाटणा येथे झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीलाही पवार यांनी हजेरी लावली होती. तर आता ते या बैठकीला हजर राहणार असून ही बाब आता मविआसाठी फार महत्वाची मानली जात आहे.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
ठाकरे बंधूंची युती कधी? राज यांच्या भेटीनंतर परबांनी स्पष्टच सांगितल..
निवडणुका जाहीर होताच राऊत राज ठाकरेंच्या भेटीला, 'शिवतीर्थ'वर खलबतं

