”आमच्या घराण्यात”…, उदयनराजे यांनी नाव न घेता पवारांवर थेट वार का केला?
भाजपने मोठी जबाबदारी दिली तरी एनसीपीवर काही परिणाम होणार नाही. लोकसभेच्या पोटनिवडणुकीत हा भाजपला अनुभव आला आहे असे म्हटलं होते.
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांच्यावर निशाना साधला होता. तसेच भाजपने मोठी जबाबदारी दिली तरी एनसीपीवर काही परिणाम होणार नाही. लोकसभेच्या पोटनिवडणुकीत हा भाजपला अनुभव आला आहे असे म्हटलं होते. ते रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त नऊ मे रोजी साताऱ्यात असताना बोलले होते. त्यावर आता उदयनराजे भोसले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी ‘पवार साहेब हे वयाने मोठे आहेत. त्यांचे विचार आणि वाचनही मोठे आहे. त्यामुळे सातारा लोकसभेच्या मागील निवडणूक निकालाबाबत ते म्हणाले ते योग्य आहे. पण आमच्या घराण्यात विश्वासघात करण्याची परंपरा नाही. निवडणुकीत कोण काय करते हा भाग वेगळा आहे. तर मी राजीनामा दिला, पण मागे घेतला नाही. त्यांनी दिला आणि मागे घेतला का? ते त्यांना विचारा असेही ते म्हणाले.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

