शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी, विनंती करत म्हणाले…
ncp Sharad Pawar letter to Cm Eknath Shinde : पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे. मात्र या जिल्ह्यातील अनेक भागात नेहमी दुष्काळ असतो. यापार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहून महत्त्वाची मागणी केली आहे.
पुणे जिल्हा राज्यातील महत्त्वाचा जिल्हा असून पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे. मात्र या जिल्ह्यातील अनेक भागात नेहमी दुष्काळ असतो. यापार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहून महत्त्वाची मागणी केली आहे. पुणे जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीबाबत बैठक बोलवण्याची विनंती शरद पवार यांनी पत्राद्वारे एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. शरद पवार यांनी यासंदर्भात एक ट्विट केले असून त्याला मुख्यमंत्री शिंदेंना पाठवलेलं पत्र जोडले आहे आणि पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील पारंपरिक दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. यासाठी गांभीर्याने महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्याची विनंती शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..

