AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नितेश राणे यांचा राऊत यांच्यावर पुन्हा हल्लाबोल, म्हणाले, ‘त्यांच्या रक्तातच हे’

नितेश राणे यांचा राऊत यांच्यावर पुन्हा हल्लाबोल, म्हणाले, ‘त्यांच्या रक्तातच हे’

| Updated on: Jun 15, 2023 | 3:46 PM
Share

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत या दोघांनाही जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. तर सुनील राऊत यांच्या फोनवरून ही धमकी आली होती. एका महिन्याच्या आत संजय राऊत आणि सुनील राऊत यांना स्मशनात पोहचवू, अशी धमकी देण्यात आली होती. तर राऊत यांना दुसऱ्यांदा अशी धमकी आल्याने एकच खळबळ माजली होती.

मुंबई : काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आली होती. त्यापाठोपाठ ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत या दोघांनाही जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. तर सुनील राऊत यांच्या फोनवर ही धमकी आली होती. एका महिन्याच्या आत संजय राऊत आणि सुनील राऊत यांना स्मशनात पोहचवू, अशी धमकी देण्यात आली होती. तर राऊत यांना दुसऱ्यांदा अशी धमकी आल्याने एकच खळबळ माजली होती. यावरून भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी आता खळबळजनक दावा केला आहे. तसेच संजय राऊत यांच्यावर आरोप करताना टीका देखील केली आहे. नितेश राणे यांनी, खोटं बोलणं हे राऊतांच्या रक्तातच आहे. राऊत धमकी प्रकरणात मयुर शिंदेला अटक करण्यात आली आहे. मयुर शिंदे हा सुनील राऊतांचा निकटवर्तीय आहे. राऊतांची सुरक्षा वाढवण्यासाठीच शिंदे याने धमकीचा कट रचला असा आरोप राणेंनी केला आहे. तसेच राऊतांनी कार्यकर्त्याला धमकी देण्यास सांगून फोन रेकॉर्ड केला आहे. खोटं बोलणं हे राऊत यांच्या रक्तात आहे. संजय राऊत दाऊदपासून सगळ्यांची भाषा करतो. म्हणून मी याला भांडुपचा देवानंद म्हणतो. स्वत:च्याच कार्यकर्त्याकडून स्वत:लाच धमकी द्यायचा कॉल करवून घ्यायचा आणि आपल्याला धमकी मिळाल्याचं सांगून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करायची. हा राऊत लवकरच तुम्हाला जेलमध्ये दिसणार असेही सुतोवाच नितेश राणे यांनी केले आहेत.

Published on: Jun 15, 2023 02:51 PM