…तर राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढण्याचा विचार करेल, जयंत पाटील यांचं वक्तव्य

राष्ट्रवादी स्वबळाची चाचपणी करत नाही. पण काँग्रेस (Congress) स्वबळाचा आग्रह करत असेल, तर राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढण्याचा विचार करेल, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.

उस्मानाबाद : राष्ट्रवादी स्वबळाची चाचपणी करत नाही. पण काँग्रेस (Congress) स्वबळाचा आग्रह करत असेल, तर राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढण्याचा विचार करेल. काँग्रेसचा स्वबळाचा आग्रह शेवटपर्यंत टिकेल असं वाटत नाही, असा टोला लगावत काँग्रेसला सोबत घेण्याचा प्रयत्न करु, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी तुळजापुरात केलं. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेला तुळजाभवानीचं दर्शन घेऊन सुरुवात झाली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह मंत्री धनंजय मुंडे, नेते संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत उस्मानाबादमधून राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचा आरंभ झाला. तुळजाभवानी मातेची आरती आणि दर्शन घेऊन त्यांनी परिवार संवाद यात्रेला सुरुवात झाली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI