Sharad Pawar Live | केंद्र सरकारनं घटनादुरुस्ती, पण ही ओबीसींची शुद्ध फसवणूक : शरद पवार
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारने 102वी घटना दुरुस्ती करून राज्यांना ओबीसींची यादी तयार करण्याचे अधिकार दिले. यावर भाष्य केले.
केंद्र सरकारने 102वी घटना दुरुस्ती करून राज्यांना ओबीसींची यादी तयार करण्याचे अधिकार दिले. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन ओबीसी आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडली. राष्ट्रावादीचे नेते छगन भुजबळ यांनी जातीनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे जोपर्यंत जातीनिहाय जनगणना होत नाही, तोपर्यंत छोट्या समुहाला आरक्षण मिळणार नाही. केंद्राने जातीनिहाय जनगणना करावी, इम्पिरिकल डेटा राज्यांना द्यावा आणि 50 टक्के आरक्षण मर्यादेची अट काढून टाकावी. या तीन गोष्टी केल्याशिवाय ओबीसींच्या आरक्षणाचा मार्ग खऱ्या अर्थाने मोकळा होणार नाही, असं पवारांनी स्पष्ट केलं.
Latest Videos
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला

